एटी फाऊंडेशन चे लीडर्स अक्षय आणि वैभवी यांची कौतुकास्पद निवड

KolhapurLive
पश्चिम महाराष्ट्रामधून पहिल्यांदाच कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून निवड 
खेडेगावात राहणारे एटी फाऊंडेशन चे लीडर्स कु. वैभवी पाटील आणि कु. अक्षय पावले यांचे कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून कोचेस अक्रॉस काँटिनेंट्स, भारत या संस्थेने निवड केली आहे. 

गेल्या वर्षी एटी फाऊंडेशन, कोल्हापूर आयोजित कोचेस अक्रॉस काँटिनेंट्स, भारत या संस्था मार्फत गडहिंग्लज येथे तीन दिवशीय स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट कोचेस ट्रेनिंग आयोजित करण्यात आले होते. या ट्रेनिंग मध्ये सहभागी वैभवी व अक्षय यांच्या उल्लेखनीय कामगिरी ची नोंद घेत दोघांची निवड करण्यात आली आहे.

सध्या अक्षय आर्दाळ तालुका आजरा या गावचे एटीएफ लीडर तर वैभवी कडाल तालुका गडहिंग्लज या गावाचे एटीएफ लीडर म्हणून एटी फाऊंडेशन मार्फत मुलांना नियमित ट्रेनिंग देण्याचे काम करत आहेत. पुढे एटी फाऊंडेशन, कोल्हापूर व कोचेस अक्रॉस काँटिनेंट्स, भारत यांच्या मार्फत कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून विविध राज्यामध्ये जावून शिकवण्याचे काम करणार आहेत. 
अक्षय हे संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज तर वैभवी ह्या गडहिंग्लज हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधे शिकत आहेत.

सुरवातीपासूनच या दोन्ही लीडर्सनी माजी राष्ट्रीय खेळाडू व एटी फाऊंडेशन च्या संस्थापिका, अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणूक घेतली आहे. क्रीडाशिक्षक व एटी फाऊंडेशन चे बोर्ड मेंबर अनिल पाटील यांची मदत नेहमीच मोलाची आहे. 
तसेच कोचेस अक्रॉस कँटिनेंट्स या संस्थेच्या इन्स्ट्रक्टर सरस्वती नेगी,(उत्तराखंड) व प्रविण कुट्टी (केरळ) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच अनिल पाटील 

अंजू तुरंबेकर म्हणाल्या, वैभवी व अक्षय यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा व अभिनंदन. खेडेगावातील युवा मुलामुलींनच्या टैलेंट ला शोधून व त्यांच्या नेतृत्व गुणाला वाव देत, खेळाच्या माध्यमातून आयुष्यामध्ये कशी उंच भरारी मारता येईल ह्याचा प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये एटी फाऊंडेशन व ॲडॅप्ट फुटबॉल ॲकॅटमी च्या कामाद्वारे अनेक लीडर्स व खेळाडू तयार करु अशी त्यांनी ग्वाही दिली.