वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उद्या गडहिंग्लज दौऱ्यावर

KolhapurLive
गडहिंग्लज : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथमच गडहिंग्लजच्या दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता येथील नगरपालिकेच्या समोर प्रांगणात महायुतीच्यावतीने त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यावेळी नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आदी महायुतीच्या घटक पक्षाच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.