मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये तब्बल ३७ विद्यार्थी प्रमाणपत्र धारक ठरले, तर कुमारी श्रेया पाटील,कुमार स्वानंद बागडी, कुमारी स्नेहल संभाजी, कुमारी ऋग्वेदा जाधव, कुमार साई देसाई या विद्यार्थ्यांची पुढील प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली.या सर्व विद्यार्थ्यांना 'अभिनव सायन्स अकॅडमी'चे डायरेक्टर डॉ. अमोल पाटील सर सर्व शिक्षक तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.