गडहिंग्लज :येथील शिवराज महाविद्यालयाच्या बी. कॉम इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी कु.अंकिता सुभाष बेळगुद्री सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कु.अंकिता सुभाष बेळगुद्री यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना - शिवराज महाविद्यालयातील डॉ.महेश चौगुले यांच्यासह सर्वांनी दिलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून खऱ्याअर्थी घडलो आहोत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मला ही परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य झाले असल्याचे सांगितले. तसेच मला माझे वडील, आई आणि कुटुंबीयांनी दिलेले प्रोत्साहन मी कधीच विसरू शकणार नाही असे सांगून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी अंकिताच्या या यशाचे कौतुक करून बेळगुद्री कुटुंबाने विशेषतः त्याचे वडील आणि आई यांनी दिलेला आधार अंकिताच्या या यशाला नक्कीच प्रेरणा देणारे असल्याचे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अंकिताच्या आई सौ.वर्षा बेळगुद्री, वडील श्री सुभाष बेळगुद्री, डॉ.महेश चौगुले, डॉ.दीपक खेडकर,प्रा.के.एस.देसाई प्रा.पौर्णिमा कुराडे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा.तानाजी चौगुले रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर, यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.