गडहिंग्लज :येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्राचार्य राहुल जाधव व प्रा. अमर पाटील लिखित 'ह्युमन अॅनाटॉमी अँड फीजीऑलॉजी' या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी स्वराज मल्टीस्पेशालिटीचे डॉ. अजित पाटोळे व उद्योजिका सौ. शर्वरी पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.
या कार्यक्रमात लेखक प्रा. अमर पाटील यांनी या पुस्तकामध्ये बी. फार्मसी प्रथम सेमिस्टरमधील शरीररचनाशास्त्र या विषयावर पुस्तकाचे लेखन केले आहे. हे पुस्तक डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लेखक प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी या पुस्तकातील अभ्यासक्रमाबाबत थोडक्यात माहिती दिली. यावेळी स्वराज मल्टीस्पेशालिटीचे डॉ. अजित पाटोळे, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी लेखकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, फार्मसीचे सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण जाधव यांनी केले. तर आभार प्रा. पूजा गुरव यांनी मानले.