गडहिंग्लज :येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित जीपॅट स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न झाली. प्रारंभी जीपॅट सेलचे प्रमुख प्रा. अमर पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते प्रा. गौरव गाडगीळ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जीपॅट ही परीक्षा एम. फार्मसीसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. जीपॅटचा अभ्यास करताना फार्मसीच्या विषयांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी या परीक्षेचे स्वरूप व फायदे तसेच या परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करावा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी जीपॅट परीक्षेचे महत्व सांगितले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेमध्ये १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 'जीपॅट सेल' चे प्रमुख प्रा. अमर पाटील, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.