शिवराज महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

KolhapurLive
 
गडहिंग्लज : उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ‘सेकंड होम’ मानल्यास स्पर्धा परीक्षाच काय जीवनातील कोणत्याही परीक्षेत हमखास यश मिळेल असे प्रतिपादन बिद्री येथील दुधसाखर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.अतुल नगरकर यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण अग्रणी महाविद्यालय, हलकर्णी व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा आणि ग्रंथालय’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. या कार्यशाळेचे उदघाटन तर संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘स्पर्धा परीक्षा व ग्रंथालय’ या विषयावर मार्गदर्शन करताना बिद्री येथील दुधसाखर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.अतुल नगरकर यांनी ‘स्पर्धा परीक्षा व ग्रंथालय’ या विषयावर मार्गदर्शन करताना साधन व्यक्ती म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले- सद्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय तरणोपाय नाही. स्पर्धा परीक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या संदर्भ ग्रंथ व विविधांगी पुस्तकांचा अभ्यास करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तकांबरोबरच जर्नल्सच्या माध्यमातून संशोधनात्मक माहिती ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपले करिअर सक्षम करण्यासाठी कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ज्ञान साधनेचा जास्तीत-जास्त उपयोग करून आपली वाटचाल समृद्ध करा. शिवाय आपण सततच्या वाचनातून स्पर्धा परीक्षेतील ध्येय गाठणे गरजेचे आहे असल्याचे स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ग्रंथालय सेवेचा अधिका-अधिक लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

या ‘स्पर्धा परीक्षेची तयारी आणि ग्रंथालयाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शनामध्ये प्रा.जॉर्ज क्रुज यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केल्यास पदवी पूर्ण होताच यशाची शक्यता अधिका वाढते. जरी यश मिळाले नाही तरी स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून जबाबदार नागरिकांची जडण-घडण होते. अये प्रतिपादन केले. स्पर्धा परीक्षेत करिअर घडविण्याऱ्या विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत-जास्त उपयोग करून घेणे आवश्यक आहे. ग्रंथालयातून विचार देणारी अधिका-अधिक पुस्तके वाचा. आपण केलेल्या अभ्यासाचे समाधान मिळाले पाहिजे. तरच तुमचे आयुष्य खऱ्याअर्थी समृध्द होईल स्पर्धा परीक्षेत आकलनात्मक अभ्यास करणारी विद्यार्थीच यशस्वी होऊ शकतात जीवनात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्यापेक्षा बुद्धिमान असणे महत्वाचे आहे. तुमच्याकडे काहीतरी आहे हे जेंव्हा सिद्ध कराल तेंव्हा तुम्हाला किंमत आहे. ही किंमत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी घडले पाहिजे. त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी आपली असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असा विश्वास श्री क्रुज यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षेत करिअर करायचे ठरविले असेल तर आपण आतापासूनच महाविद्यालयीन काळातच नियोजन करणे गरजेचे आहे. काय वाचणे आवश्यक आहे.आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याचे वेळीच विचार मंथन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अभ्यास कसा व कशाप्रकारे करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी यावेळी संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रा.एस.के.शिऊडकर व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यशाळेतील सहभागींना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत डॉ.जी.जी.गायकवाड, प्रा.पौर्णिमा कुराडे, अग्रणी महाविद्यालयाअंतर्गत विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यासह, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख नॅक समन्वयक प्रा.किशोर आदाटे यांनी करून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्रा.दिपक खेडकर यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ.अशोक मोरमारे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे व ग्रंथालय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.