गडहिंग्लज :येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी स्वागत प्रा. मनीषा जाधव यांनी केले. या स्पर्धेचे उदघाटन साखर कारखान्याच्या माजी संचालक सौ. क्रांतीदेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी सौ. क्रांतीदेवी कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण सर्व नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा करतो. यावेळी त्यांनी नवरात्रीचे महत्व सांगितले. शिवाय आजच्या मुलींनी सुरक्षेच्या बाबतीत सक्षम बनले पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषेमध्ये बहारदार दांडिया नृत्यांनी मंत्रमुग्ध केले. हा सांस्कृतिक कार्यक्रम प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अनघा पाटील व प्रा. सुमन अडीसरे यांच्या पुढाकाराने व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पडला.