राजेश पाटील यांच्या प्रयत्नाने फाटकवाडी धरणाच्या उजव्या सांडवाचे काम सुरू

KolhapurLive

फाटकवाडी, ता. चंदगड: -
आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते फाटकवाडी धरण प्रकल्पातील उजव्या सांडवा आणि संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी २४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अतिपावसामुळे धरणाच्या रिटेनिंग हॉलला हानी पोहोचल्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धरण फुटल्याची अफवा पसरल्याने गावकऱ्यांनी स्थलांतरही सुरू केले होते. परंतु रिटेनिंग हॉल तुटल्यामुळे पाणी सांडव्यातून वाहून जात होते.

आमदार राजेश पाटील यांनी तत्काळ पाठपुरावा करत धरणाच्या उजव्या सांडवा आणि संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून दिला. 

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, "स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांनी या धरणासाठी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यांना पूजनाचा सन्मान मिळाला नाही, आजच्या शुभप्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असावी." आज त्यांच्याच पुत्राच्या हस्ते या धरणाचे संरक्षण भिंतीचे पूजन झाले हे मी माझे खूप मोठे भाग्य समजतो,आणि हे सर्व मी तुमच्यामुळेच करू शकलो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय नरसिंगराव पाटील साहेबांचा पुत्राच्या मागे राहाल अशी अपेक्षा करतो.

यावेळी रोहित बांदिवडेकर(कार्यकारी अभियंता), प्रणव डोंगरकर (कॉन्ट्रॅक्टर),पाटील स्वामी(डेप्युटी इंजिनियर फाटकवाडी), डोईफोडे(डेप्युटी इंजिनिअर), सरपंच प्रभावती गावडे (सडेगुडवळे), उपसरपंच अस्मिता फाटक (सडेगुडवळे), उपसरपंच अंबादास पाटील (कानूर), सरपंच अमित चिटणीस, गोविंद सावंत, गोविंद अमृसकर, गुरव ताई, बाबाजी विठ्ठल गावडे, अण्णाप्पा हुंबरवाडी, अशोक पाटील, अभय देसाई, बाळू बांदिवडेकर, प्रवीण वाटंगी, एस. एल. पाटील, विजयकुमार दळवी, सुनील कोंडुसकर, नारायण गडकरी, निंगाप्पा बोकडे,तसेच कानुर ते अडकूर पंचक्रोशीतील शेतकरी यांसह स्थानिक ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते.