गडहिंग्लज :गडहिंग्लज उपविभागातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. किसनराव कुराडे हे यावर्षी ८१ व्या वर्षात पदार्पण करीत असून तिथीप्रमाणे रक्षाबंधना दिवशी १९ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने या उपविभागातील शंभर शाळांना 'एक रोप एक पुस्तक' भेट देण्यात येणार असून सदर रोप जगविण्याचा व पुस्तके वाचण्याचा संकल्प विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि वाचन या विषयी गोडी निर्माण व्हावी हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अॅड. कुराडे यांनी सांगितले.
सध्या पावसाचे दिवस असल्याने येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये मोठा समारंभ घेऊन 'सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा' आयोजित करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.