शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांचा ८१ वा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांचा ८१ वा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित या उपविभागातील शंभरहून अधिक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन एक रोप प्रा.कुराडे लिखित एक ग्रंथ व पत्र देऊन या विधायक उपक्रमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा तसेच वाचन चळवळीतून विद्यार्थी घडला पाहिजे हा संदेश शिवराज विद्या संकुलामार्फत देण्यात आला. या उपक्रमाचे उपविभागातील हायस्कूल व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष कौतुक केले. या विधायक उपक्रमातून संस्थेने जपलेला हा ऋणानुबंध खरोखरच आजच्या धावत्या युगात निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी व्यक्त केले. यावेळी या उपविभागातील विविध मान्यवरांच्या व विविध संस्थांच्या पदाधिकारी यांच्यामार्फत विद्या संकुलात आयोजित करण्यात कार्यक्रमात प्रा. किसनराव कुराडे यांना अभीष्टचिंतन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसानिमित्त एन.सी.सी व खेळ विभाग आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रा. कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री बसवराज यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री बी.एन. पाटील-गिजवणेकर यांच्या हस्ते प्रा. किसनराव कुराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिल्ली येथे महाराष्ट्र डायरेक्टर मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी एन.सी.सी. कॅडेट वैष्णवी भोईटे व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती प्रा. किसनराव कुराडे यांना आपल्या सत्काराला उत्तर देताना गुरूंनी दिलेल्या संस्कारातून मी खऱ्याअर्थी घडलो आहे. त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करू शकलो. समाज हेच आपले कुटुंब मानून समाजासाठी आयुष्य वेचले आहे ते अखेरच्या श्वासापर्यंत जपणार असल्याचे प्रा. किसनराव कुराडे स्पष्ट केले. यावेळी बी.एन. पाटील-गिजवणेकर, नंदाताईं बाभुळकर, श्री एम. के. सुतार सर, शाहीर सदानंद शिंदे, राजकीय विश्लेषक श्री भाऊसाहेब आजबे, कन्या विजयाताई कुराडे-आजबे, प्राचार्य डॉ.एस.एम. कदम, वाचनकट्टाचे युवराज कदम, बाळेश नाईक, डॉ. सुधीर मुंज, बाळासाहेब देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रा. कुराडे यांना शुभेच्छा दिल्या. नुलच्या सुरगीश्वर मठाचे गुरुसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी यांनी प्रा. कुराडे यांचे अभिष्ठचिंतन करून शुभाशीर्वाद दिल्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनेही प्रा. कुराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कुराडे सर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी दयानंद पट्टणकुडी, अरविंद पाटील, राजू पाटील, बाळासाहेब मंचेकर, एस.आर. पाटील, प्रकाश तेलवेकर, राजशेखर येरटे, श्री शंकरराव रणदिवे गुरुजी, तमान्ना पाटील, नेमीनाथ निलापगोळ, सिद्धाप्पा कल्याणी, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष के.जी. पाटील, संस्थेचे पदाधिकारी के. व्ही. पेडणेकर, श्री नंदनवाडे गुरुजी, श्री पापा