शिवराज महाविद्यालयात ‘नशा मुक्तीची सामुहिक शपथ’

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित नशा मुक्त भारत अभियानास पाच वर्षे झाल्याबद्दल अंमली पदार्थांचा दुरुपयोग विरुद्ध विद्यार्थ्यांना नशा मुक्त राहण्याची सामुहिक शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. प्रारंभी नोडल ऑफिसर ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी प्रास्ताविकातून भारत सरकारच्या माध्यमातून आपला देश अंमली पदार्थांचा दुरुपयोग टाळून नशा मुक्त झाला पाहिजे. यासाठी शासन पाच वर्षे सातत्याने प्रयत्न करीत आहे. आपल्या देशातील तरुणाईने नशामुक्त जीवन जगावे आणि आपल्या देशाला सक्षम करण्यात मोलाची भूमिका बजावावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी, शिक्षक व स्टाफ यांना नशामुक्तीची शपथ दिली. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, डॉ.डी.पी. खेडकर, डॉ.ए.जी.हारदारे, प्रा.दत्तू जाधव , रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, स्टाफ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.