लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या कार्याला उजाळा देणारे गुडू शाहीर कला मंच :- डॉ सचिन पोवार

KolhapurLive
 उतूर - प्रतिनिधी - श्री. गुंडू शाहीर कला, क्रीडा, व सांस्कृतिक मंच , आरळगुंडी यांचा हनुमंताचा जागर श्रावणी महोत्सव परंपरा गेली 21 वर्षे अखडीतपणे जपणारे व लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या कार्याला उजाळा देणारे शाहीर म्हूणन ख्याती असलेले शाहीर गुंडू राजाराम यांनी श्रावणमास शनिवार निमित्त हनुमंताचा जागर श्रावणी महोत्सवाची सुरुवात हनुमान मंदिर - नेहरू चौक उतूर येथे करण्यात आली. असे मत श्रावणी महत्वाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्य लोककला महोत्सव समिती कोल्हापूर व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे संस्थापक डॉ सचिन पोवार. यांनी काढले.ते उत्तूर येथील श्रावणी महोत्सव उदघाट्न प्रसंगी बोलत होते. लोककला महोत्सव समितीचे संपर्कप्रमुख गणपती नागरपोळे, लोक कलाकार संघाचे आजरा तालुकाध्यक्ष राजाराम कोपटकर , गुंडू शाहीर कला मंच चे सचिव दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व गुंडू शाहीर कला, क्रीडा, सांस्कृतिक मंच आरळगुंडी चे संस्थापक शाहीर गुंडू राजाराम अध्यक्षस्थानी होते. शाहीर रामदास सातपुते राधानगरी यांनी स्वागत गीताने सुरुवात केली. प्रास्तविक श्रावणी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी करून कलाकार सूचना व माहिती सांगितली. शाहीर मारूती केसरकर, संजय इंगळे, सदानंद शिंदे, पांडुरंग येजरे यांनी विविध पोवाडे व रेणुका देवीचे गाणी मालूबाई सुतार यांनी सादर केली. तबला वादक,सुरपेटी वादक आधी सर्व प्रकारच्या लोक कलाकारानी आपापल्या कला सादर करून परिसरात एक उत्साहाची लाट निर्माण केली. गुंडू शाहीर यांनी ही लोककला टिकवून नवोदित व नव - नवीन कलाकाराना या मंच च्या वतीने हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले असे मत लोककला महोत्सव समितीचे प्रमुख गणपती नागरपोळे यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ शाहीर गुंडू शाहीर कला मंचचे संस्थापक गुंडू राजाराम म्हणाले, आम्ही ही कला जपली टिकवली तशीच ही कला नवीन पिढीने या लोककलेचा आदर करून पुढील पिढी पर्यत पोहचविन्याचे काम आता तरुण युवकांनी सुरू ठेवून ही लोककला झोपावे असे मत मांडले. कार्यक्रमाचे सांगता ज्ञानदेव रेडेकर यांच्या भजनाने झाली. यावेळी शाहीर संताजी भाटले, धोंडीराम कांबळे, बयाजी ससाने, सुशांत पाटील,साताप्पा गुरव, उत्तुरकर मामा, दिलीप पाटील, आनंद कांबळे,रोहिदास सातपुते ,दत्तात्रय पाटील, धनाजी शित्रे, पिटू चौगले, मनीषा सुतार,मालुबाई सुतार आदी सह भुदरगड,राधानगरी , उतूर परिसरातील विविध कलाकारांनी हजेरी लावून आपली कलासादर केली. सूत्रसंचालन गायक श्रीपाल कांबळे यांनी तर आभार गुंडू शाहीर कला मंचचे सचिव दत्ता पाटील यांनी मानले.