गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.मनमोहन राजे यांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व प्रा.पौर्णिमा कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ.लोहिता माने यांनी आण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. आण्णा भाऊ साठेंनी विपुल साहित्य निर्मिती करून समाजात जागृती आणि प्रबोधन केले तर टिळकांनी राष्ट्रप्रेमाची भावना समाजात रुजवून ऐक्य निर्माण केले,’ असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले तर आभार डॉ. श्रद्धा पाटील यांनी मानले. पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले, डॉ.एस.डी.सावंत, डॉ.ए.एम.हसूरे, डॉ.एन.बी.ईकिले यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.