शिवराज महाविद्यालयात ‘अॅनिमेशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात अॅनिमेशन’ विभागाच्या वतीने ‘अॅनिमेशन’ या विषयावर प्रोफेशन ट्रेनर अमर त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक‘अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा.बी.एस.पठाण यांनी केले.

यावेळी अमर त्रिवेदी यांनी अॅनिमेशन अभ्यासक्रम हा महत्वपूर्ण असा कोर्स आहे. सद्या या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना सर्वत्र डिमांड आहे. आधुनिक जगात अॅनिमेशन ही नाविन्यपूर्ण कला जोपासण्यासाठी अॅनिमेशन अभ्यासक्रम शिकणे काळाची गरज आहे. अॅनिमेशनमुळे वेब डिझाईन, कार्टून, व्ही.एफ.एक्स., ग्राफिक्स, चित्रपट, मेडिकल, वृत्तपत्र, जाहिराती अन्य डिजिटल वर्ल्ड मध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत. या संधी मिळविण्यासाठी अॅनिमेशन अभ्यासक्रम शिकणे आवश्यक आहे. अॅनिमेशन क्षेत्र आज कलात्मक जीवनाचा एक भाग बनला आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन श्री त्रिवेदी यांनी केले. यावेळी त्यांनी अॅनिमेशन अभ्यासक्रम का व कसा उपयोगी ठरत आहे. या क्षेत्रात असणाऱ्या विविध संधीबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन कार्यक्रमास प्रा.विश्वजित कुराडे, प्रा.के.एस.देसाई विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. तर आभार प्रा.ओंकार पाटील यांनी मानले.