गडहिंग्लज : बांधकाम कामगार योजनेतून शिक्षणासाठी 60,000 रु मंजूर
आमचे मार्गदर्शक श्री.विठल जाधव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी बाधकांम कामगार योजनेच्या माध्यमातून आज त्यांना शिक्षणासाठी शिशुवृत्ती रोख 60 हजार रुपये मंजूर करुन दिले यासाठीचे पत्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.महेश सलवादे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या हस्ते देण्यात आले. सोबत एम एस बोजगर व इतर उपस्थित होते. या कामासाठी विशेष प्रयत्न श्री.संतोष.चि.कांबळे, रुनी सलवादे, साहील दुधी,किरण म्हेत्री आदीनी विशेष प्रयत्न केले. श्री. विठल जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आपल्या कार्यालयातून एक ही रुपये न घेता हसन मुश्रीफ साहेबांनी सांगितलेल्या समाजसेवेचे व्रत आपण अगदी प्रामाणिकपणे पाळत आहात असे महेश सलवादे यांच्या बाबतीत त्यांनी उदगार काढले.