गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या खेळाडूंनी पंधरा वर्षाखालील जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत उपविजेते व हत्ती-कोले शालेय चषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या फुटबॉल खेळाडूंना शिवराज महाविद्यालयाचे केमिस्ट्रीचे प्रा. विश्वजित अनिलराव कुराडे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त ट्रॅकसूट वाटप करून गौरव करण्यात आला. प्रा. विश्वजित कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ. राहुल मगदूम यांनी केले. यावेळी या अरिंजय हातरोटे, अरमान मिरा, साईश पाटील, विवेक कशब, अलोक पाटील, समीन मणेर, सिद्धार्थ हुलसार, अकीलेश कुराडे, श्रेयस सासणे, सुमित पाटील, समर्थ शिंगाडे, रणवीर कुराडे, रेहान बोजगर, धैर्यशील वाघ, गणेश चव्हाण, मुझीफ उटी, प्रणव पाटील, अनिकेत सावंत आदी खेळाडूंना गौरविण्यात आले. या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक श्री ए. बी. पाटील व क्रीडा शिक्षक श्री किरण कावणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सत्कार प्रसंगी श्री अनिल पाटील, श्री काशिनाथ बारामती यांच्यासह स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.