टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाली. यानंतर भारतीय संघाचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईतील नरीमन पाईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत त्यांचे विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक ओपन बस तयार करण्यात आली होती. ही बस गुजरातला बनवल्याचे त्याच्या नंबर प्लेटवरुन समोर आले आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार निशाणा साधला.
बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
हा महाराष्ट्राला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याआधीही वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय टीम जेव्हा मुंबईत आली होती, तेव्हा या ठिकाणच्या बस, गाड्यांचा वापर जल्लोष करण्यासाठी केला जात होता. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. संपूर्ण देशात सर्व काही गुजरात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.