अंजू तुरंबेकर यांच्या कडून ४६ मुलांनी फुटबॉल सोबत घेतले नेतृत्व कौशल्ये विकासाचे धडे

KolhapurLive



फुटबॉल खेळातून नेतृत्व गुण विकास - एटी फाऊंडेशन ची युवा पिढीसाठी अतुलनिय कामगिरी
खेडेगावातील मुलांना नेतृत्व गुण विकासाद्वारे जीवनाची योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न. 

एटी फाऊंडेशन आयोजित भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने ४६ मुलांसाठी रहिवासी नेतृत्व कौशल्ये कार्यशाळा निसर्गरम्य सातारा मेगा फुड पार्क मधे पार पडली. ही कार्यशाळा २५ ते २७ जून २०२४ दरम्यान १६ ते २२ या वयोगटातील मुलांसाठी झाली तर या मधे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, आणि चंदगड तालुक्यातील विविध खेडेगावातील मुलांनी भाग घेतला.
 
या कार्यशाळेमध्ये मुलांना फुटबॉल खेळासोबत नेतृत्व, जीवन आणि मूलभूत कौशल्ये विकसित करण्याचे धडे दिले.
एटी फाऊंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाच्या जबाबदारीतून वेळ काढत परदेशाहून येऊन ही कार्यशाळा या मुलांसाठी राबिवली आहे.

मुलांमध्ये शिकण्याची आवड, धाडसी वृत्ती व सकारात्मक विचार करण्याची पद्धत निर्माण करणे, स्वप्ने पाहण्यासाठी प्रवृत्त करणे, माणुसकी जपणे, फुटबॉल खेळाची चुणूक शिकणे, सांघिक कार्य कौशल्ये शिकणे अश्या विविध महत्व्याच्या पैलुंवर चर्चा व प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना धडे देण्यात आले.

अवघ्या तीनच दिवसामध्ये मुलांमध्ये परिवर्तन घडून आल्याचा आनंद अंजू तुरंबेकर यांनी व्यक्त केला. सर्वच मुले प्रतिभावंत असतात आणि त्यांना योग्य त्या वयामधे योग्य ते मार्गदर्शन व दिशा दाखवणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. 

लीडरशिप सम्मीट च्या अखेर सर्व मुलांना मेडल्स व सर्टिफिकेट्स देवून गौरवण्यात आले. 

भारत विकास ग्रुप चे व्हिजनरी संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी एटी फाउंडेशन च्या कार्याला सहाय्य करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अश्या युवा पिढीच्या व समाज कार्यासाठी सतत मदत करत राहू याची गाव्ही दिली. 

प्रोग्राम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारत विकास ग्रुप मॅनेजमेंट ची टीम, फाऊंडेशन चे बोर्ड मेंबर व क्रिडाशिक्षक अनिल पाटील, बोर्ड मेंबर अमोल तुरंबेकर, लीडर अक्षय पावले, सम्राट चव्हाण, यशस्विनी बोराटे, शिवतेज पाटील, अश्विनी तुरंबेकर, सुलक्षणा पावले, सोनम महाडीक यांनी कष्ट घेतले.