शिवराज फौंडेशन मार्फत लाडकी बहिण योजनेसंदर्भात मार्गदर्शन

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज फौंडेशनच्या वतीने महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन भरण्यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर पार पडले.

सद्यस्थितीत सर्व्हर डाऊन असल्याने व अतिरिक्त काम अंगणवाडी सेविकांवर असल्याने स्वताःचे स्वतः मोबाईलव्दारे सदर योजनेचे अर्ज कसे भरता येईल याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षक सौ. निलम मोदर (बेकनाळ) यांनी महिलांना दिली. फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्या याबाबतही त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बहुसंख्य महिला-भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला, शिवराज फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

एम. आर. हायस्कूल समोरील श्री साने गुरुजी पतसंस्था सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये स्मितल कोरडे, दिपिका यादव, मुबीना पाटील, सीमा आजरी, सीमा मांगले, दिपा मगदूम यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या शिवराज फाउंडेशनचे श्री बसवराज आजरी यांनी सर्वांचे आभार मानले.