गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे रविवारी (दि. २१) समरजितसिंह आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त 'चला संकल्प करूया ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया' या नागरिकांसाठीच्या विशेष अभियनांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने महालक्ष्मी मंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा उपक्रम होणार आहे. गडहिंग्लज, गिजवणे, अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ, ऐनापूर, कौलगे, हिरलगे, करंबळी, शिप्पूर, जख्खेवाडी, कडगाव, बेकनाळ, लिंगनूर, वडरगे, बड्याचीवाडी या गावातील नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे