तीन आठवड्यापूर्वी गुन्हा नोंद होऊनही आरोपींच्या मुसक्या का आवळल्या जात नाहीत? आरोपी जेरबंद होऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्हाला मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे, सौ. रेखा आवळे, शाहीन महात, सौ. मीरा मोरे, श्रीमती कांबळे, सौ. पदभजा भालबर, सौ. शीतल शिंदे, सौ. स्वाती मोरे आदी प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
निवेदनातील म्हंटले आहे,
माननीय श्रीमंत सौ. नवोदीतादेवी समरजितसिंहराजे घाटगे यांची दि. दोन ते पाच जून २०२४ या दरम्यान २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी आठ जून २०२४ रोजी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तशा बातम्याही नऊ जून, २०२४ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये आल्या आहेत. त्याच दिवशी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे म्हणजेच सायबर क्राईम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याच्या बातम्या आम्ही १० जून २०२४ च्या वृत्तपत्रामध्ये वाचल्या.
सौ. नवोदीतादेवी समरजीतसिंह घाटगे यांनी मलेशियामध्ये पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स, बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड्स असल्याचे दूरध्वनी अनिल यादव व अजित (पूर्ण नाव समजू शकले नाही) या नावांच्या व्यक्तींकडून आले. त्यानंतर सौ. घाटगे यांच्या खात्यावरून २० लाख रुपये वर्ग झाले आहेत. पोलिसात तक्रार दाखल करून आणि संबंधित प्रकरणाचा तपास आपल्या विभागाकडे वर्ग करून तीन आठवडे झाले. तरीही यामध्ये आपणाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
निवेदनातील प्रमुख मुद्दे असे...
१. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह मलेशियाचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन. आय. ए. कडे आणि अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्सचा समावेश असल्यामुळे एन.सी. बी. (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अर्थात राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडे द्या.......
२. सौ. घाटगे यांना ज्यांनी सीबीआय आणि कस्टम अधिकारी म्हणून फोन केल्यानंतर त्या दोन बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे २० लाख रुपये वर्ग केले. त्या बँक खात्यांचा शोध घेऊन त्या दोघांच्या मुसक्या अद्यापही का आवळल्या नाहीत ?
३. या गंभीर प्रकरणाने एक नवीनच वळण घेतले आहे. ते म्हणजे, २६ जून २०२४ रोजी राधानगरीमध्ये पत्रकारांशी बोलताना सौ. घाटगे यांनी आपल्यावर हिप्नॉटिझम म्हणजेच संमोहन केल्याचे सांगितले आहे. हा तर नवीनच विषय पुढे आला आहे. हे प्रकरण अधिकच गंभीर आहे. संमोहन शास्त्रानुसार संमोहन करणारी व्यक्ती सततच्या संपर्कातील चांगल्या परीचयाची आणि जवळची असली पाहिजे. त्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.
४. परदेशात पाठवलेल्या त्या पार्सलचे पुढे काय झाले? म्हणजे ते ज्या ठिकाणी पाठवायचे होते तिथे ते पोहोचले की नाही? सध्या ते पार्सल नेमकं कुठे आहे?
५. परदेशात पाठविलेल्या त्या पार्सलमध्ये जर काही आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर नसेलच तर मग ते प्रकरण मिटविण्यासाठी तब्बल २० लाख रुपये द्यायची काय गरज होती? याचाही खुलासा झालाच पाहिजे.
कोल्हापूर: सौ नवोदीता घाटगे यांच्या झालेल्या वीस लाख फसवणूकप्रकरणी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळून हा तपास सीबीआय, ए एन आय आणि एनसीबीकडे द्या, या मागणीचे निवेदन सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. म्हेत्रे यांना देताना महिला पदाधिकारी.