गडहिंग्लज : येथील साने गुरुजी सहकारी पतसंस्थेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या चंदगड,आजरा व गडहिंग्लज उपविभागीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रारंभी विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव यांनी स्वागत केले. ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री बी.जे. पाटील यांनी 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी होत कोल्हापुरात होत असलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून ग्राहक चळवळ सर्वांच्या पर्यंत पोहोचावी यासाठी ग्राहक चळवळीतला कार्यकर्ता सक्षम व्हावा तसेच ही चळवळ सामान्यांना न्याय द्यावी यासाठी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी विविध खात्याचे अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शक लाभणार आहे. अशी माहिती दिली. जिल्हा कोषाध्यक्ष श्री अशोक पोतनीस साहेब यांनी ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत मोलाची आहे या कार्यशाळेचा लाभ ग्राहक पंचायतीचा कार्यकर्त्यांनी घ्यावा असे आवाहन करून ही कार्यशाळा सर्वांनी एकत्रित येऊन यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर भदरगे साहेब यांनी ग्राहक सेवेतूनच ईश्वरी भक्तीकार्याचा आनंद जपूया. सामाजिक कार्याचा आत्मिक आनंद मिळवूया. तालुक्यात ग्राहकांचे हित जपण्यासाठी ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र सुरू करण्यासाठी विधायक उपक्रम लवकरच सुरू करण्याबाबतचे आवाहन केले व त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्री अशोक पोतनीस साहेब यांची
विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच पदी स्वतंत्र सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या आजरा, गडहिंग्लज कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीत ग्राहक पंचायत गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष श्री तानाजी कुराडे यांच्या दिवंगत मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीस गडहिंग्लज तालुकाध्यक्ष श्री महादेव ढोकरे -पाटील, आजरा तालुका अध्यक्ष श्री सुतार, अनिल शिंदे, सचिन लोहार सुरेश वडराळे आदी उपस्थित होते. आभार तालुका सचिव श्री अनिल कलकुटकी यांनी मानले.