शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचे उत्तुंग यश

KolhapurLive


गडहिंग्लजः येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल लागला. महाराष्ट्र तंत्रनिकेतन मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या विधार्थ्यांनी उज्वल यश मिळविले. प्रथम वर्षात मानसी पालंडे (७६.७० टक्के), सानिया मानगावकर (७२.७० टक्के), सुमित्रा गावडे (६९ टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले तर द्वितीय वर्षामध्ये प्राजक्ता कोकितकर (८२.६४ टक्के), सुश्मिता गडदार (८१.०९ टक्के), दिव्यश्री डांगी (८०.८२ टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. यशस्वी विध्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड, दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.