शिवराज विद्या संकुलामध्ये बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन,कॉम्प्युटर अॅप्लिकेशन पदवीअभ्यासक्रमास प्रवेश सुरु

KolhapurLive

गडहिंग्लज: येथील शिवराज विद्या संकुलामध्ये शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभाग अंतर्गत सुरु असलेल्या बी.बी.ए., बी.सी.ए. या अभ्यासक्रमांना शासनाच्या मान्यतेच्या अधीन राहून विद्यापीठाने अनुक्रमे बी.कॉम. (बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन), बी.कॉम. (कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) या नामाभिधान बदलास मान्यता दिलेली आहे. या पदवी अभ्यासक्रमास महाविद्यालयात प्रवेश सुरु आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी केले आहे.

गेल्या वीस वर्षापासून बी.बी.ए., बी.सी.ए. हे कोर्सेस महाविद्यालयात यशस्वीपणे सुरु आहेत. त्यासाठी नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाने नेहमीच आघाडी घेतली आहे. यासाठी महाविद्यालयात तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बी.बी.ए., बी.सी.ए. हे कोर्स बी.कॉम. (बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन), बी.कॉम. (कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) या नावाने विद्यापीठाच्या मान्यतेने सुरु झालेले आहेत. तरी बारावी उत्तीर्ण असलेल्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी केले आहे.