गडहिंग्लज : शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जोतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित बहिरेवाडी येथील रोशनबी, शमनजी कृषी महाविद्यालयात बुधवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालय परिसरामध्ये कडुलिंब वृक्षाची लागवड प्रा. किरण धातोंडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रा. एस. एस. देसाई यांनी पर्यावणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाजभाई शमनजी, लक्ष्मण कंग्राळकर, सुलोचना रेडेकर, संस्थेचे रजिस्टार शफी अहमद, प्राचार्य प्रा. एम. डी. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विश्वस्त निलेश कंग्राळर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.