ग्राहक पंचायत गडहिंग्लजची तालुका अध्यक्षपदी ईश्वर देसाई उपाध्यक्ष पदी तानाजी कुराडे, डॉ. महादेव ढोकरे -पाटील यांची निवड कार्यकारिणी जाहीर

KolhapurLive

गडहिंग्लज : ग्राहक पंचायत अध्यक्षपदी श्री ईश्वर नारायण देसाई(ऐनापुर), उपाध्यक्षपदी श्री तानाजी केदारी कुराडे(येणेचवंडी), डॉ. महादेव ज्ञानदेव ढोकरे -पाटील, सचिव -श्री अनिल लक्ष्मण कलकुटकी (गडहिंग्लज),सहसचिव - सौ रत्ना उत्तम सुतार (हलकर्णी),मार्गदर्शक सल्लागार - श्री बाळेश नाईक( बसर्गे),संघटक श्री महादेव शिंगे (भडगाव), सहसंघटक प्रा. सुरेश वडराळे, तर महिला संघटक - श्रीमती रोहिणी श्रीराम चौगुले(कडगाव), कोषाध्यक्ष-सचिन मारुती लोहार (गिजवणे )सदस्य - श्री अनिल तुकाराम शिंदे (हिरलगे )यांची निवड झाली.
ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री बी. जे. पाटील. सल्लागार ऍडव्होकेट विवेक पाटील, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुका विभागीय अध्यक्ष श्री शिवाजीराव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नूतन पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष श्री शिवाजीराव गुरव यांनी केले. यावेळी ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री बी. जे. पाटील. सल्लागार ऍडव्होकेट विवेक पाटील यांनी संघटनेच्या कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथे होणाऱ्या दोन दिवसीय राज्य प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आभार श्री अनिल कलकुटकी यांनी मानले.