पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा अपघात झाला आहे. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीला धडक दिली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे गंभीर नुकसान झाले. त्यामुळे चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे