गडहिंग्लज : येथील शिवराज सायन्स अॅकॅडमीचे विद्यार्थी बारावी एम.एच.टी.सीईटी परीक्षेत शिवम संजय चौगुले (९६.९७), सृष्टी चंद्रकांत कोरी (९३.९९), अथर्व संतोष पाटील (९१.४३), प्रेमकुमार संतोष कुरळे (८८.७०), वनिता विठ्ठल जाधव (८६.२६), सौरभ संजयकुमार बागडी (८६.२०) या विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले. या सर्व यशस्वीतांचे अॅकॅडमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अॅकॅडमीच्या माध्यमातून एम.एच.टी.सीईटी परीक्षेसाठी स्वतंत्रपणे क्रॅश कोर्स व विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कसून अभ्यास करून घेण्यात येत आहे. त्यामुळे शिवराज सायन्स अॅकॅडमीचे विद्यार्थी सीईटी परीक्षेत चमकत असल्याचे स्पष्ट करून सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच चालू शैक्षणिक वर्षामध्ये देखील शिवराज सायन्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी केले. यावेळी अॅकॅडमीचे समन्वयक श्री सचिन काटे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा.विक्रम शिंदे यांसह सर्व शिक्षक उपस्थित होते.