गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील व पुणे, मुंबई, अहमदनगर, तासगाव येथून एकूण ३० जणांचा सहभाग होता. ट्रेनिंग मधे खेळाचे शिक्षक, फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक आणि एटी फाऊंडेशन चे लिडर्स यांचा सहभाग होता. या ट्रेनिंगसाठी कोचेस अक्रॉस कँटिनेंट्स या संस्थेकडून सरस्वती नेगी,(उत्तराखंड) व प्रविण कुट्टी (केरळ) इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहीले, तर गुलाफशा अंसारी(मुंबई) यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले.
खेळ हा मुलामुलींच्या तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधला एक जरुरी व महत्व्याचा घटक आहे. खेळाद्वारे मुलांचा व समाजा मधल्या विविध पैलूंचा विकास कसा घडवता येतो ह्याबद्दल चर्चा करुन प्रात्यक्षिका द्वारे ह्या ट्रेनिंग मधे सहभागींना शिकवण्यात आले.
या ट्रेनिंगच्या सांगता समारंभ वेळी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी, श्री. मल्लिकार्जुन माने, एटी फाऊंडेशन च्या संस्थापिका अंजू तुरंबेकर आणि गडहिंग्लज हायस्कुल चे प्राचार्य श्री, पंडीत पाटील यांच्या हस्ते सहभागींना कंप्लीशन व पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडाशिक्षक अनिल पाटील यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान बोलताना अंजू तुरंबेकर यांनी सर्व सहभागिंचे पहिल्या वहिल्या ट्रेनिंगच्या भरघोस प्रतिसाबद्दल अभिनंदन केले. पुढे त्या म्हणाल्या, खेळामुळे मी घडले आहे व याच माध्यमा द्वारे मला माझ्या मातीसाठी, माझ्या भागासाठी चांगले काही तरी करायचे आहे, त्यासाठी सात्यत्याने प्रयत्न करत राहू. प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात आणि ते आपण ओळखून त्यावर काम केले पाहिजे, मग यश तुमचेच असेल असे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी माने यांनी एटी फाऊंडेशन ने केलेल्या कामाचा आढावा घेत कौतुक केले व गरुड भरारी घेतलेल्या अंजू तुरंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शिकण्यास मिळत असलेल्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे व सर्वांनी त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ घ्यावा असे सांगितले. बोलताना, त्यांनी खेळाचे महत्व पटवून देत, आपल्या आयुष्याच्या वाटचालीचे अनुभव सांगून सर्वांना मेहनत करुन आयुष्य घडवण्यासाठी प्रेरीत केले.
राष्ट्रीय खेळाडू अंजू तुरंबेकर यांनी असे प्रथमच आपल्या भागामध्ये ट्रेनिंग घडवून आणले असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग पार पडले. प्राचार्य श्री, पंडीत पाटील यांचे सहकार्य अमूल्य सहकार्य लाभले.
फाऊंडेशन चे बोर्ड मेंबर अनिल पाटील, अमोल तुरंबेकर, लीडर अक्षय पावले, सम्राट चव्हाण, यशस्विनी बोराटे, शिवतेज पाटील यांनी ट्रेनिंग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कष्ट घेतले.