टी20 वर्ल्ड कपचे सुपर-8 चे चित्र स्पष्ट… भारताची कधी अन् कोणाबरोबर लढत, पूर्ण शेड्यूल

KolhapurLive

टी20 वर्ल्ड कपचे सुपर-8 चे चित्र स्पष्ट आता स्पष्ट झाले आहे. रविवारी स्कॉटलंड अन् ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखत विजय मिळाला. त्यामुळे इंग्लंडला फायदा झाला. इंग्लंडचा संघ सुपर 8 मध्ये पोहचला. तसेच सुपर 8 मध्ये पोहचणारी सर्वात शेवटचा संघ बांगलादेशचा ठरला आहे. बांगलादेशने नेपाळचा 21 धावांनी पराभव करत सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केला.

भारत आणि अमेरिकेचा (यूएसए) संघ गट-अ मधून पात्र ठरले आहेत. ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ सुपर 8 मध्ये आला आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने क गटातून स्थान मिळवले आहे. तर गट-ड मधून दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत.

सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट असतील. या दोन्ही गटातून दोन संघ अव्वल राहिल्यास त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारताशिवाय ग्रुप-१ मध्ये बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि गतविजेता इंग्लंड यांना गट-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट असणार आहे. या दोन्ही गटातून दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. ग्रुप-१ मध्ये भारताशिवाय बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. तर दुसऱ्या गटात वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड आहे.

भारताच्या लढती अशा रंगणार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 20 जून रोजी बार्बाडोस येथे सुपर-8 टप्प्यातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर दुसरा सामना 22 जून रोजी अँटिग्वा येथे बांगलादेश विरुद्ध सामना होणार आहे. सुपर-8 मध्ये भारताचा शेवटचा सामना 24 जून सेंट लुस‍ियामध्ये ऑस्ट्रेल‍िया विरुद्ध होणार आहे. सुपर 8 मधील भारताचे सर्व सामने रात्री 8 वाजता होणार आहे.