शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सहसंवादी शिक्षण या डीजीटल माध्यमाचे उदघाटन संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सहसंवादी शिक्षण या डीजीटल माध्यमाचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत प्रा. मनीषा जाधव यांनी केले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी प्रास्ताविकातून नव्या शैक्षणिक धोरणामध्ये या सहसंवादी शिक्षणाची गरज ओळखून या डीजीटल माध्यमाच्या माध्यमातून आजच्या विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे हे ओळखून या नव्या उपक्रमाचा प्रारंभ होत असल्याचे सांगितले. या सहसंवादी डिजिटल माध्यमातून शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी बनते व विद्यार्थ्यांच्या सहभागाला अधिक प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट केले. याचा वापर दृश्य व दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थीना प्रभावीपणे माहिती प्रदान करणे सोपे होते असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सध्याच्या शिक्षणात आमुलाग्र बदल होत आहे. या बदलत्या शैक्षणिक पर्वात आजचा विद्यार्थी अधिक सक्षम व्हावा यासाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे यासाठी असे डिजिटल शिक्षण देणे विद्यार्थी हिताला प्राधान्य देण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी फार्मसीचे सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.