शिवराज महाविद्यालयात एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज  : येथील शिवराज महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.आर.डी. कमते यांनी केले. उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या खूप संधी आहेत. एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी नोकरी बरोबरच व्यवसायात करिअर करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक असल्याचे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.ए.एस.आरबोळे, प्रा.एम.एस.मरजे, प्रा.एम.बी.हवालदार, प्रा.ए.एस.करगावे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. शुभांगी उचगावकर, रेखा डोंगरे, ऋषिकेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ..एस.एम.कदम यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.सौरभ पाटील, श्री सचिन शिरहट्टी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.प्रा.अनिता पोवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.नाजीया बोजगर यांनी मानले.