गडहिंग्लज : गडहिंग्लज शहराचे ग्रामदैवत श्री हाळलक्ष्मी देवीची मंगळवार दिनांक १४ मे २०२४ रोजी यात्रा संपन्न होत आहे. अशी माहिती श्री हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट वडरगे रोड, गडहिंग्लज यांच्या वतीने कळविणेत येत आहे. सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेचे १४ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यात्रेचे नियोजन देवस्थान कमिटी व गणेश मंडळ यांच्या वतीने करणेत येत आहे.
सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री यशवंत पाटील खातेदार यांच्या वाडयातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मंगळवार दिनांक १४ मे २०२४ रोजी सकाळी ६ वाजता अभिषेख व पुजा अर्चा होईल, त्यानंतर सेवेकरी कुंभार समाजाच्यावतीने आकर्षक पुजा बांधणेत येणार आहे. दुपारी १२ वाजता श्री पनोरे समाजाचा मानाचा नैवेद्य व आरती झाल्या नंतर महाप्रसादास प्रारंभ होईल. दुपारी ४.०० वाजता वडरगे गावच्या श्री गोसावीनाथांच्या पालखीची गळाभेट होवून दोन्ही पालख्या मंदिरात विराजमान होतील.
या यात्रेचे नियोजन करण्यासाठी श्री हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री किरण कदम यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपाध्यक्ष श्री प्रकाश रोटे, सचिव श्री प्रकाश पोवार, खजिनदान श्री यशवंत कोले, सदस्य युवराज बरगे, महेश पाटणे, विजय मोरे, संजय रोटे, प्रविण शिंदे, प्रशांत शिंदे, राजेश रोटे, काशिनाथ बेळगुदी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी श्री सदानंद शिंदे, अरुण शिंदे, संदिप रोटे व हाळलक्ष्मी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोराटे व सर्व पदाधिकारी व कुंभार समाजाचे यशवंत कुंभार, अनिल कुंभार, सुनिल कुंभार, आप्पा कुंभार व सर्वसेवेकरी उपस्थित होते. यात्रा सुरळीत पार पाडणेसाठी सर्वजण प्रयत्न करीत असून भाविकांनी यात्रा समितीस योग्य ते सहकार्य करावे असे अवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले.