गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने ‘महात्मा बसवेश्वर’ यांना जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.एस.एम.कदम होते. प्रारंभी ‘महात्मा बसवेश्वर’ यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आंले.
या कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.एस.एस.सावेकर यांनी केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये -महात्मा बसवेश्वर यांनी समतेचे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची प्रचिती संपूर्ण जगाला आलेली आहे. त्याकाळी त्यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकाच छताखाली आणण्याचे महान कार्य केले. महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकामध्ये लोकशाहीचा पाया मजबूत केला. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा या थोर महामानवाला अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ.आर.पी.हेंडगे यांनीही आपल्या मार्गदर्शनातून ‘महात्मा बसवेश्वर’ यांच्या कार्याला उजाळा दिला. ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रजिष्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. डॉ.विनायक सरदेसाई यांनी सर्वांचे आभार मानले.