गडहिंग्लज : सखी महिला मंडळ गडिंग्लज व अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडहिंग्लज च्या कार्यकर्त्यांनी गेली दोन महिने समाज सेवेच्या भावनेतून ताहीर मकानदार यांनीं गडहिंग्लज मध्ये चालू असलेल्या हायवेच्या कामामुळे होणारे वाहतुकीचे विस्कळीत वातावरण पाहून वाहतूक नियंत्रणाचे काम रमजान महिना चालू असताना देखील उन्हामध्ये उभे राहून सामाजिक भावनेतून स्वैच्छेने गडहिंग्ल शहराच्याा वाहतूक नियंत्रणाच्या कामामध्येये दिलेल्या योगदानबद्दल जामा मजीद येथे प्रत्यक्ष रोडवर ट्रॅफिक नियंत्रणाचे काम करत असताना ताहीर मकानदार यांचा पुष्पगुच्छ ;शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सखी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ उज्वला दळवी श्रीमती अरुणा शिंदे श्रीमती उर्मिला कदम सौ सुमन सावंत सौ सुवर्णलता गोविलकर सौ छाया वडगावे सौ गीता पाटील सौ शारदा जळकर सविता चव्हाण सौ गीता पालकर तसेच बाळासाहेब मुल्ला हे सर्व कार्यकर्ते तसेच अनेक उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला