गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त बी.बी.ए., बी.सी.ए अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा दर्जा वाढणार आहे. शिवाय ए.आय.सी.टी.ई.मुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सदरचा कोर्सची गुणवत्ता व रोजगाराभिमुखता वाढणार आहे. या अभ्यासक्रमाबाबत आवश्यक माहितीसाठी व प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्र सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी दिली.
नवीन शैक्षणिक वर्षापासून यु.जी.सी. आणि ए.आय.सी.टी.ई. यांच्या निर्देशानुसार बी.बी.ए., बी.सी.ए. या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सीईटी प्रवेश परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. या संदर्भात शिवराज महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र व प्रवेश परीक्षा नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी बारावी पास व सद्या बारावी परीक्षा दिलेल्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी शिवराज महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व अॅकॅडेमीक डायरेक्टर डॉ.आर.एस.निळपणकर,अॅकॅडेमी विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई, बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते, प्रा.आझाद पटेल, प्रा.बी.एस.पठाण, प्रा.विक्रम शिंदे आदी या माहिती केंद्राच्या स्थापनाप्रसंगी उपस्थित होते. या प्रवेश परीक्षेची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि.११ एप्रिल २०२४ पर्यंत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अॅकॅडेमी विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई ९९७०२२२७६७, बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते-९५५२६३५३८६, मिल्टन नोरेंज ९९२३४१६६१४ यांच्याशी संपर्क साधावा.