गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने समाजसुधारक ‘महात्मा फुले’ यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. प्रारंभी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.डी.सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे आणि संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात हिंदी विभाग प्रमुख डॉ.एन.बी.एकिले यांनी ‘महात्मा फुले’ यांच्या जीवनकार्याबाबत मार्गदर्शन करताना- महात्मा फुले यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जीवन कार्याची ओळख नव्या पिढीला होणे काळाची गरज आहे. त्यांनी त्या काळी समाजातील जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. असे प्रतिपादन डॉ.एन.बी.एकिले यांनी केले.
यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए.एम.हसुरे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, डॉ.एस.बी.माने, प्रा.एम.एस.घस्ती, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.रंगराव हेंडगे मानले.