शनिवारी गडहिंग्लज शहरात संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ महायुतीचा भव्य मेळावा

KolhapurLive

गडहिंग्लज- लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे व ठीक ठिकाणी महायुतीचे मेळावे संपन्न होत आहेत.हरएक ठिकाणी महायुतीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळत आहे. शनिवारी गडहिंग्लज शहरात देखील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा घेण्यात येणार आहे.

     कागल विधानसभा म्हणजे मंत्री मुश्रीफ यांचा बालेकिल्ला व त्यात गडहिंग्लज शहराला म्हणजे विशेष महत्व. आज अनेक कार्यकर्ते व नेतेमंडळी मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज शहरात कार्यरत आहेत. व आता शनिवारी दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गडहिंग्लज शहरात भगवा चौक येथील बसवेश्वर बोर्डिंग समोरील खुल्या जागेत ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेळाव्याच्या जागेची पाहणी करून सभेसाठी तयारी करताना दिसून आले.