गडहिंग्लज : टीमवर्क आणि कर्मचाऱ्यांचा कामातील प्रामाणिकपणामुळेच अल्पावधीत रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटीने कौतुकास्पद प्रगती केल्याचे मत डॉक्टर किरण पाटील यांनी व्यक्त केले.येथील रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटीने पण प्रगती केल्याचे मत डॉक्टर किरण पाटील यांनी व्यक्त केली.
येथील रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटी व ज्ञानदीप प्रबोधिनी गडहिंग्लज यांच्यामार्फत निरो सायंटिफिक रिसर्च पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी एम. एल. चौगुले होते. सुरुवातीस श्रवणाचे संस्थापक अध्यक्ष श्री चौगुले यांच्या हस्ते डॉक्टर किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.व्ही.के. मायदेव यानी स्वागत केले यावेळी बोलताना डॉक्टर पाटील पुढे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे. प्रतिकूल परिस्थितीत ही विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश संपादन करू शकतात अशी अनेक उदाहरणे ग्रामीण भागातून आल्याची दिसतात. अध्यक्ष स्थानावरून बोलताना एम एल चौगुले म्हणाले डॉक्टर पाटील यांनी पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे न लागता ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेच्या उद्देशाने आपली मातीशी नाळ जोडली आहे. रुग्णसेवा आणि संशोधन या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. ते एक तज्ञ निरो सर्जन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी संचालक महेश मजती, संजय चौगुले, रेखा पोतदार, संदीप कागवाडे, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, गौरी बेळगुंद्री यांच्यासह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी सागर माने यांनी केले, तर आभार नंदकुमार शेळके यांनी मानले.