राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत 'शिवराज'ची निकिता दुंडगे, आराधना देसाई, सानिया सय्यद व्दितीय

KolhapurLive

गडहिंग्लज : राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथे बायोव्हीजन क्लब मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत येथील शिवराज महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या विद्यार्थिनी निकिता शिवानंद दुंडगे, आराधना सुधीर देसाई, सानिया जावेद सय्यद यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. महाविद्यालयाच्या वतीने या सर्व विद्यार्थीनीचे संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थिनींना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांचे प्रोत्साहन तर प्रा. किशोर आदाटे, प्रा. सुप्रिया मिसाळ, प्रा. मृणालिनी अस्वले, प्रा. स्वाती शिंदे, प्रा. आकांक्षा कडूकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.