गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने विविध मागणीचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केले आहे. संपाच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव आणि आरोग्य सेवा विभाग आणि कृती समितीच्या बैठकीत झालेले निर्णय हे लिखित स्वरूपाच्या आदेशात काढावेत, अशी मागणी सदर निवेदनातून केली आहे. यामध्ये दिवाळीची भेट, मानधन वाढ आदींचा समावेश आहे. निवेदनावर राधिका घाटगे, उज्वला पाटील, नंदा मनमाड, लता नरेवाडी, सुजाता जरळी, साधना खोत, सुवर्ण खपले, अर्चना सुतार, सविता वाळकी आदींच्या सह्या आहेत.