भडगावची महालक्ष्मी यात्रा अखेर ठरली

KolhapurLive


भडगाव :  या गावची महालक्ष्मी यात्रा मे २०१८ साली संपन्न झाली होती. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे २०२५ ला महालक्ष्मी यात्रा करण्यासंबंधी शिक्कामोर्तब झाले.

 रविवारी ४ फेब्रुवारी रोजी महालक्ष्मी मंदिर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत पुढील वर्षी म्हणजे २०२५ साली एप्रिल महिन्याच्या अखेरीस महालक्ष्मी यात्रा करण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर यावेळी परंपरागतरीत्या प्रत्येक सात वर्षांनी

यात्रा ही संपन्न व्हावी आणि यात्रेच्या निमित्ताने गावातील प्रलंबित विकासकामे देखील वेळीच पूर्ण करण्यात यावी अशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मागील यात्रा समितीचे सदस्य, सरपंच वंदना शेंडुरे, उपसरपंच रविशंकर बंदी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, विविध संस्थेचे, तरुण मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार पोलीस पाटील उदय पुजारी यांनी मानले.