गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात मराठी विभाग यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी केले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ.ए.बी. कुंभार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मौलिक असे योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या या क्रांतीमुळे समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षणाची खरी संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आधुनिक शिक्षणाचा पाया घालण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. ए. बी. कुंभार यांनी केले.
या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी, सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ. अशोक मोरमारे यांनी मानले.