गडहिंग्लज मध्ये संजीवनी कृषी प्रदर्शन

KolhapurLive

या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शनिवार दि. 06 जानेवारी पासुन प्रारंभ
मा. श्री राज डावरे यांची माहिती

गडहिंग्लज - संजीवनी महिला कृषी विकास व बहुउद्देशीय संस्था, किसान अॅग्रीकल्चरल अॅण्ड इंडस्ट्रियल एक्झिबीशन सोसायटी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, गडहिंग्लज नगरपालिका गडहिंग्लज आणि राज इव्हेंट, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एस. टी. स्टॅण्ड मागे, गर्ल्स हायस्कूल जवळ, खुले मैदान, गडहिंग्लज, जि. कोल्हापुर येथे "गडहिंग्लज संजीवनी कृषी प्रदर्शन 2024" या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे 06 जानेवारी ते 09 जानेवारी 2024 राजी आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी 10.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये सर्वांना प्रवेश विनामुल्य आहे.

या प्रदर्शनात ट्रॅक्टर शेतीसाठी लागणारी अवजारे बि-बियाणे, खते, व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पध्दती, टिश्युकल्चर, कृषी व्यवस्थापक, शेती अर्थ पुरवठा, बैंकिंग इन्शुरन्स, मार्केटिंग व्यवस्थापन, रोपवाटिका (नर्सरी), पाणी व्यवस्थापन, शासकीय व विना शासकीय संस्था संघटना में शासकीय एजन्सीज, दुग्ध व्यवसाय, अपारंपारिक ऊर्जा, मत्स्योत्पादन, रेशीम उदयोग याच बरोबर अन्न प्रकिया व साठवणूक पैकेजिंग पध्दती, महाराष्ट्र शासन कृयी विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, गडहिंग्लज तालुका कृषी विभाग, महात्मा फुले कबी विदयापीठ, राहूरी अंतर्गत कृषी महाविदयालय कोल्हापूर आदी विषयी प्रात्यक्षीक व माहिती मिळू शकेल या प्रदर्शनात शेतीत नव नवीन प्रयोग करणान्या शेतक-यांसाठी शेतमालाची (ऊस, केळी, फुले, फळे) पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये शेतकन्यांनी सहभाग घेण्यासाठी आपल्या पिकाचा नमुना प्रदर्शनात सादर करावा.

बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करुन देण्यासाठी शेती संबंधी विविध स्टॉलवर शेतक-यांच्या करीता तज्ञाच्या मार्गदर्शनाची सोय केली आहे. तरी सर्व भागातील शेतकऱ्यांनी गडहिंग्लज संजीवनी कृषी प्रदर्शनाला भेट देवून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व आपल्या शेतीमध्ये प्रगती करून घ्यावी असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्टॉल बुकींगसाठी संपर्क : राज डावरे