शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्ताने जनजागृतीचे आयोजन

KolhapurLive
गडहिंग्लजः येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीचे आयोजन करण्यात आले. गडहिंग्लज शहरातील विविध भागातून प्रभातफेरी काढून एड्स रोगाविषयी जनजागृती करण्यात आली, प्रारंभी या प्रभातफेरीचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस.वाय.कोतमिरे उपस्थित होते. याप्रसंगी शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून पूर्वी एड्स रोगाविषयी फारशी जनजागृती नव्हती. परंतू जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने यासंदर्भात माहितीचे प्रसारण शक्य झाले असून पुढील काही वर्षात पोलिओ प्रमाणे एड्स सारख्या रोगाचे निर्मूलन करता येऊ शकते असे त्यांनीसांगितले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय क्षेत्रात आता झपाट्याने बदल होत आहेत. याचाही फायदा आजच्या घडीला दिसून येत आहे. सैद्धान्तिक ज्ञानापेक्षा जनजागृतीद्वारे अशा प्रकारच्या रोगांवर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. शिवाय फार्मासीस्टसही मोलाची जबाबदारी पार पाडत आहेत. असे सांगून सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थासचिव डॉ. अनिलराव कुराडे व संचालक अॅड. दिग्विजय कुराडे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचे एन.एस. एस. विभाग प्रमुख प्रा. सोहेल राऊत यांच्यासह प्राध्यापक, सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.