गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स विना-अनुदानित विभागाचा पालक मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पालक प्रतिनिधी श्री प्रकाश आकलेकर होते. शिवरान विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. सीमा कांबळे यांनी केले.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आमचे शिवराज विद्या संकुल हे शैक्षणिक क्षेत्रात नेहमीचे अग्रेसर आहे. या संकुलामध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची खूप संधी आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन आपल्या करिअरला दिशा देण्यासाठी शिवराज विद्या संकुलामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध कोर्सेसचा लाभ घेऊन आपले भवितव्य घडवावे' पालकांनी आपल्या पाल्याबाबत वेळीच दक्ष राहून आपल्या पाल्याचे करिअर कसे घडविता येईल याबाबत पालकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी
प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधा व उपक्रम यांचा आढावा घेऊन आज पालकांनी आपल्या पाल्याबाबत वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे. महाविद्यालयात वेळो वेळी भेट देऊन आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा संबधित शिक्षकांकडून घेणे आवश्यक असल्याचे सांगून सविस्तरपणे मार्गदर्शन केले, विना-अनुदानित ज्युनिअर विंगचे प्रमुख प्रा. संदीप कुराडे यांनी चालू शैक्षणिक वर्षाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले तसेच श्री प्रकाश आकलेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. यावेळी पालक रेश्मा कुंभार, उत्तम पाटील, श्री दत्ता नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, बहुसंख्य पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डी. आर. बेलेकर, प्रा. अंकिता काळे यांनी केले तर आभार प्रा. सुनिता देसाई यांनी आभार मानले.