गडहिंग्लज : पंचायत समिती गडहिंग्लज व शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तालुकास्तरीय जल जीवन व स्वच्छता मिशन वक्तृत्व स्पर्धा' संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. या स्पर्धेत सिनिअर गटात शिवराज महाविद्यालयाची अमृता पांडुरंग सागर तर ज्युनिअर गटात संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजची रिया मारुती वाघे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी स्पर्धा समन्वयक डॉ. आनंदा कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम व पंचायत समितीचे विषय तज्ञ दयानंद कोरवी यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा सिनिअर गट- व्दितीय क्रमांक- संकेत कृष्णात पाटील शिवराज महाविद्यालय, तृतीय क्रमांक- साक्षी तिबिले - डॉ. घाळी महाविद्यालय गडहिंग्लज, ज्युनिअर गट - छाया शिंगटे (व्दितीय), साक्षी किरण पाटील (तृतीय), दोन्ही संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. श्रद्धा पाटील व प्रा. स्वप्नील आर्दाळकर यांनी केले. यावेळी पंचायत समिती पाणी स्वच्छता कक्षाचे समूह समन्वयक श्री ए.एस. हेब्बुले, प्रा. पौर्णिमा कुराडे, प्रा. गीता देसाई, यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले तर आभार श्री पंचायत समिती पाणी स्वच्छता विभागाचे गट समन्वयक बी.ए. वाडेकर यांनी मानले. या स्पर्धेमध्ये १५ स्पर्धक सहभागी झाले होते.