गडहिंग्लजः येथील शिवराज महाविद्यालय व पोस्ट कार्यालय यांच्या सहयोगाने दोन दिवशीय आधार कार्ड नोंदणी, अद्यावत व नूतनीकरण कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते, प्रारंभी रजिस्ट्रार श्री संतोष शहापूरकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
या कार्यशाळेमध्ये पोस्ट कार्यालयाचे डाक निरीक्षक श्री गणेश चोथे यांनी आधार कार्ड बाबत मार्गदर्शन केले तसेच पोस्ट विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवा व योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्रशासकीय सेवक व शिक्षकांनी आपले आधार कार्ड अद्यावत करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पोस्टाच्या माध्यमातून महाविद्यालयात या कार्यशाळेअंतर्गत उपलब्ध झालेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेमध्ये पोस्टमास्तर श्री दीपक कोळी, पोस्टल असिस्टंट श्री मारुती येसणे यांनी नवीन आधार नोंदणी, आधार कार्ड अपडेट करून दिले, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम. हसुरे, प्रा. गौरव पाटील, डॉ. प्रवीण डोंगरे, श्री सचिन काटे, श्री संदीप शिंदे यांच्यासह सर्व
प्रशासकीय सेवक व प्राध्यापक उपस्थित होते.