शिवराजमध्ये महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत नांदी फौंडेशन मार्फत' विद्यार्थिनी सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न

KolhapurLive
गडहिंग्लज :शिवराज महाविद्यालयात 'महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत नांदी फौंडेशन मार्फत' बी.सी.ए., बी.सी.एस., बी.एस्सी, बी.बी.ए. भाग तीनच्या विद्यार्थिनीना कंपनीच्या सी.एस.आर. योजनेतून विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी बारा दिवसांचा प्रशिक्षण संपन्न झालो. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रारंभी प्लेसमेंट विभागाचे प्रा. एन.जी. चव्हाण यांनी स्वागत करून प्रास्ताविकात प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला. कंपनीचे प्रशिक्षक श्री महेश व हकीम लकडावाला यांनी विद्यार्थीनीना सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचा लाभ देत आहोत. या प्रशिक्षणातून तुम्हाला तुमच्या कौशल्य सुधारण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून विद्यार्थिनीनी या प्रशिक्षणातून आपले करिअर घडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिवाय या प्रशिक्षणामध्ये रोजगार क्षमता विकास, कौशल्य विकास, व्यक्तीमत्व विकास, मुलाखत तंत्र आदींबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीशी संवाद साधला. प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनी इला मोंडल, पूनम देसाई, ऋषाली घोटणे (बी.सी.एस.), जान्हवी मोरे (बी.एस्सी. कॉम्प्यूटर), संजना शिंदे, रागिणी पोवार, दिया धरणे (बी.सी.ए.), वैष्णवी सुतार (बी.बी.ए.) यांना मान्यवरांच्या यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. के. एस. देसाई, बी.सी.एस. विभाग प्रमुख प्रा.रवी खोत, बी.बी.ए. विभाग प्रमुख प्रा.आर.डी. कमते, प्रा. रोहन पाटील, प्रा. विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये 250 विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.